मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत भारतील  टॉप 100 स्वच्छ शहरांची घोषणा केली. मागच्या वर्षी आठव्या क्रमांकावर असलेल्या  नवी मुंबईची यंदा नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर पुण्याने दहावं स्थान पटकावत ‘टॉप 10’ स्वच्छ शहरांमध्ये सामील होण्याची किमया केली आहे.

दुसरीकडे, मुंबईनेही या क्रमवारीत  सुधारणा केली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत मागच्या वर्षी 29 व्या स्थानावर असलेल्या मुंबईने 17 व्या स्थानी झेप घेतली आहे. या सर्वेक्षणात 2017 साली 60 व्या स्थानावर असलेल्या ठाणे शहरानेही यंदा आपल्या क्रमवारीत उसळी घेत 40 वे स्थान गाठलं आहे.

‘टॉप 10’ मधील दोन शहरांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर नऊ शहरांनी ‘टॉप 50’ मध्ये स्थान मिळवलं आहे.

दरम्यान, इंदूरने आपले पहिलं आणि भोपाळ शहराने दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.

अस्वच्छ शहरांचीही यादी

घाणेरड्या शहरांची आकडेवारीही केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामधील पहिल्या दहा शहरांत पश्चिम बंगालमधील सात शहरांचा समावेश आहे. तर उर्वरित तीन अस्वच्छ शहरे उत्तर प्रदेशातील आहेत.