कल्याण : प्रेयसी आणि तिच्या बहिणीनं फसवल्यानं निराश झालेल्या तरुणानं आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. 27 वर्षीय इलियास शेखने थिनर पिऊन आत्महत्या केली.


कल्याणच्या गोवंडी मोहल्ला इथं राहणाऱ्या इलियास शेख या तरुणाचं नात्यातच असलेल्या प्रेयसीशी लग्न ठरलं होतं. मात्र लग्नापूर्वी ही तरुणी दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. त्यानंतर तिच्या छोट्या बहिणीशी इलियासचं लग्न करायचं ठरलं. मात्र साखरपुड्यानंतर तिनंही या लग्नाला नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या इलियासनं थिनर पिऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी इलियासनं लिहिलेल्या चिठ्ठीत या सगळ्यासाठी प्रेयसीच्या आईला जबाबदार धरलं आहे. बुवाबाजीच्या नादाला लागलेल्या प्रेयसीच्या आईनं आपल्याला तिच्यापासून दूर केल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहलं आहे. तसंच महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही कायदे बनवण्यात यावेत अशी मागणी केली आहे.