पटपडताळणीसाठी सेल्फीच्या निर्णयाला शिक्षक परिषदेचा विरोध
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 03:30 PM (IST)
मुंबई : पटपडताळणीसाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक संघटेनने विरोध केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शिक्षक परिषद ही संघाची शाखा आहे.त्यामुळे शिक्षण खात्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सेल्फीच्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून उलट यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल, असा दावा शिक्षक संघटेनेने केला आहे. येत्या जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सेल्फीच्या मोहाने गैरहजर असणारे 18 टक्के विध्यार्थी शाळेकडे आकर्षित होतील, या आशेने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.