नवी मुंबई : वाशीमधील सागर विहार भागात एका तरूणावर गॅंगरेपचा प्रकार घडला आहे. परवा संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. तरूण सागर विहार येथे रस्त्यावर चालत असताना पाच जणांनी त्याला जबरदस्ती झाडीत घेवून गेले. त्यांच्यावर गॅंगरेप करण्यात आला. यावेळी त्याला मारहाण करून तोंड बंद करण्यात आले होते. रेप केल्यानंतर पीडित तरूणाच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कापड जबरदस्ती टाकण्यात आले आहे. दरम्यान गॅंगरेप करणारे आरोपी फरार झाले असून नशा करनारे गर्दुल्ले असण्याची शक्यता वर्तवली आहे.
याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणावर कोपरखैरणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करून कपडा, नारळाची कवटी बाहेर काढले आहे.
वाशी मिनी सिशोर परिसर हा वाशी खाडीला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या मॅंग्रोजची झाडी आहे. मनपाकडून याच्या लगत जॉगिंग ट्रॅक बनविला असल्याने येथे लोकांची वर्दळ असते. आजूबाजूला काॅलेजचा परिसर असल्याने दिवसा येथे प्रेमियुगलांची गर्दी मोठ्या संख्येने असते.
तरूणाबरोबर घडलेला हा प्रकार संध्याकाळी 7.30 वाजता असल्याने आश्चर्य वाटते. कारण येथे संध्याकाळी महिला वाॅकिंगसाठी येत असल्याने कदाचित नशा करून सावज शोधणाऱ्यांच्या हाताला महिला लागली नसल्याने त्यांनी तरूणाला आपली शिकार बनविले, असल्याची शक्यता आहे. गर्दुल्ल्यांना येथील झाडीझुडपातील ठिकाणं माहित असल्याने त्यांनी फुटपाथवरून जाणाऱ्या तरूणाला पाच आरोपींनी जबरदस्ती झाडीत नेले.
तिथे त्याला मारहाण करीत, तोंडावर पट्टी लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कपडा कोंबून पळ काढला. जखमी आवस्थेत पीडित तरूण तसाच आपल्या बाईकवरून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर वेळेत उपचार झाल्याने जीव वाचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नवी मुंबईत तरूणावर गॅंगरेप, बलात्कारानंतरच्या विकृतीमुळे खळबळ
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
26 Sep 2019 10:55 PM (IST)
याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणावर कोपरखैरणे येथील गगनगिरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करून कपडा, नारळाची कवटी बाहेर काढले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -