मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा आणि डेटा...सध्याच्या तरुणाईची या मूलभूत गरजा बनल्या आहेत. पण हा तरुण वर्ग एका मोठ्या विळख्यात सापडला आहे आणि तो म्हणजे वेब सीरिज. तरुणाई तासनतास आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेब सीरिज पाहण्यात गुंग असते. या सवयीला बिंज वॉचिंग असं म्हटलं जातं.


वेब सीरिज म्हणजे काय तर फुल अॅक्शन, कॉमेडी, ड्रामासोबत सर्टिफाईड अडल्ट कंटेंट मिळण्याचं एकमेव ठिकाण. मात्र, मित्रांनो हे हक्काचं ठिकाण मोठ-मोठ्या आजारपणाचं माहेरघर बनत चाललं आहे.

वेब सीरिज पाहण्याचे दुष्परिणाम

सतत वेब सीरिज पाहण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडणे

स्लिप डिसऑर्डर होणे

डोळ्याचे आजार जडणे

मणक्याचे आजार वाढणे

मुंबईतील सांताक्रूझमधलं 'द योग इन्टिट्यूट' गेल्या वर्षभरापासून यावर संशोधन करत आहे. त्यांनी देशभरात संशोधन केल्यानंतर डी-अॅडिक्शन ऑफ वेब सीरिज नावाचा उपक्रम सुरु केला आहे. वेब सीरीज डी-अॅडिक्शन प्रोग्रॅममध्ये योगाचा फार मोठा वाटा आहे. इथे भारतासह देशभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. योगाच्या माध्यमातून स्वतःवर नियंत्रण कसं मिळवता येईल हे शिकवलं जातं. तसंच लाईफस्टाईल सुधारण्यावर इथे भर दिला जातो.

मराठी, हिंदी, इंग्रजीसह वेगवेगळ्या भाषांच्या वेब सीरिज सध्या सोशल मीडियात जोरदार धुमाकूळ घालत आहेत. आता हवा तसा कंटेंट जर मिळत असेल तर कोणीही पाहणारच. वेब सीरिज पाहणं गैर नाही, परंतु कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेल्यावर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होणारच यमात्र, तो किती वेळ आणि कसं पाहायचं हा तर आपलाच चॉईस असतो.

पाहा व्हिडीओ