मुंबई मनपा शाळेत योग आणि सूर्यनमस्काराची सक्ती
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 05:44 PM (IST)
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता योग आणि सूर्यनमस्कार बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई मनपाच्या सभागृहात भाजपने मांडलेल्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली आहे. दुसरीकडे मुस्लिम धर्मात सूर्याला नमस्कार केला जात नाही. त्यामुळे सूर्यनमस्काराची सक्ती करण्यास समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. तसंच, मनसे आणि काँग्रेसने विद्यार्थ्यांना याची सक्ती न करता योग तसंच सूर्यनमस्कार ऐच्छिक करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. पाहा व्हिडीओ