Mumbai Updates: मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Meman) कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं (ABP Majha Report) समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालं. या प्रकारानं सर्वस्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसनंही भाजपवर पलटवार केला आहे. मात्र दहशतवादी याकूबची कबर कधी आणि कुणी सजवली? हा प्रश्न मात्र कायम आहे. यावर BMC आयुक्त, मस्जिद ट्रस्टींचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.
याकूब मेमनच्या कुटुंबातील 14 जणांची कबर बडा कब्रस्तानमध्ये (Mumbai Bada Kabristan) आहे. पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेल्या एक मोठ झाड पडल्यानंतर ती जागा सुरक्षित करण्यासाठी संस्थेने कठडा बांधण्याची परवानगी दिलेली होती. मात्र मार्बलने कठडा बांधण्याची ही परवानगी नव्हती. 19 मार्च 2022 ला बडी रात या दिवशी या ठिकाणी लाईट लावण्यात आलेल्या होत्या. काही लाईट काढण्यात ही आल्या. मात्र एलीडी लाईट अद्याप तशीच ठेवण्यात आली होती. आता या चौथऱ्याची एलईडी लाईट काढण्यात आलेली आहे. मार्बलचा चौथरा काढण्याच्या संदर्भात काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आयुक्त इक्बाल चहल म्हणाले, पालिकेचा संबंध नाही
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (iqbal singh chahal) यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले की बडा कब्रस्तान आमच्या (BMC) न्यायकक्षेत येत नाही. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही कारवाई किंवा तपास करू शकत नाही. ही एका खाजगी मुस्लिम ट्रस्टची जागा आहे. मुंबईत इतरही अनेक कब्रस्तान आहेत ज्या आमच्या अधिकारक्षेत्रात येतात. त्यात हे कब्रस्तान असतं तर आम्ही त्याची सविस्तर तपासणी केली असती, असं चहल यांनी सांगितलं.
महापालिका नाही तर जामा मस्जिद ऑफ ट्रस्टनं दिली परवानगी
जामा मस्जिद आॅफ बाॅम्बे ट्रस्टचे ट्रस्टी शोयब खतीब यांनी सांगितलं की, प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत. याकूब मेमनने देशाचं मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण नाही. पाच वर्षांपूर्वी जुना चौथरा तुटलेला होता म्हणून नवीन चौथरा बांधण्यास परवानगी दिली होती. या ठिकाणी रात्री अनेक पार्थिव दफन करण्यासाठी येत असतात. त्यासाठी लाईट लावलेल्या होत्या. मेमनसाठी या लाईट लावल्या नव्हत्या. बडी रात कोविडमुळे होऊ शकली नव्हती, म्हणून यावर्षी सर्वच कब्रस्तानात लाईट लावल्या होत्या, असं ते म्हणाले. कठडा बांधण्याची परवानगी जामा मस्जिद आॅफ बाॅम्बे ट्रस्टने परवानगी दिली होती. महापालिका परवानगी देत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकुबची कबर कुणी सजवली? पाहा प्रत्येक अपडेट्स