भिवंडी : महिलांच्या वेण्या कापण्याचं सत्र सुरुच आहे. भिवंडीत पुन्हा एकदा महिलेची वेणी कापल्याची घटना उघडकीस आली आहे. फातमा शाह (24) असं वेणी कापलेल्या महिलेचं नाव आहे.

भिवंडीत वेगवेगळ्या घटनेत पाच महिलांच्या वेण्या कापल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भिवंडीतली वेणी कापल्याची ही 8 दिवसांतली पाचवी घटना आहे.

भिवंडीच्या न्यू आझाद नगर मधील 24 वर्षीय फातमा शाह या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातील किचनमध्ये जेवण बनवत होत्या. फातमा यांना आपल्या डोक्यावरील केस जड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी केसांना हात लावला असता फातिमा यांची वेणी खाली पडली.

या घटनेमुळे फातमा यांना मानसिक धक्का बसला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.