...जेव्हा दलाई लामा रामदेवबाबांची दाढी खेचतात!
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2017 11:24 PM (IST)
मुंबईत पार पडलेल्या याच कार्यक्रमात धर्मगुरू दलाई लामा यांनी चक्क योगगुरू रामदेव बाबा यांची दाढी खेचली.
मुंबई : मुंबईत पार पडलेल्या याच कार्यक्रमात धर्मगुरू दलाई लामा यांनी चक्क योगगुरू रामदेव बाबा यांची दाढी खेचली. ही मजेशीर दृश्य बघून उपस्थित चांगलाच मनोरंजन झालं. या कार्यक्रमात भाषण देत असताना दलाई लामा यांनी योगगुरू रामदेवबाबांना आपल्या जवळ बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांची रामदेव बाबा यांची दाढी पकडून खेचली आणि त्यांच्यासोबत काहीशी मस्करीही केली. दरम्यान, दलाई लामांच्या या कृतीमुळे रामदेवबाबांनाही त्यांच्या योगासनं करण्याची लहर आली. रामदेवबाबांनी दलाई लामांच्या समोरचं आपलं आवडतं योगासनं करून दाखवलं. या संमेलनाला दलाईलामा, बाबा रामदेव, जैनाचार्य डॉ.लोकेश मुनी, शीख धर्मगुरू अकालतख्तचे प्रमुख जत्थेदार ज्ञानी गुरुबचनसिंह विश्वशांती संमेलनासाठी मुंबईत आले आहेत. पाहा व्हिडीओ :