वसई रेल्वे स्थानकातील ही घटना आहे. रेल्वे स्थानकात एक खाजगी तिकीट विंडो आहे. 14 जूनला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक महिला या विंडोवर तिकीट काढण्यासाठी गेली असता तिथे काम करणाऱ्या नम्रता या महिला कर्मचाऱ्याने अवार्च्य भाषेत दादागिरी आणि शिवीगाळ केली.
मात्र प्रवासी महिलेने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला म्हणून ही घटना समोर आली. रांगेत असूनही नम्रताने त्या महिलेला तिकीट देण्यास नकार दिला.
एवढंच नाही तर दादागिरी करणाऱ्या नम्रताने ट्रेनमध्ये जाऊनही त्या महिलेशी दादागिरी केली. तिला दमदाटी करून चैन पुलिंगही केली. या घटनेनंतर नम्रताने तेथील नोकरी सोडली आहे. मात्र या प्रकरणात तिकीट घेणाऱ्या महिलेची चूक असून, तिने तिकीट विंडोची काच फोडली असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पाहा व्हिडिओ :