विरार : विरारमध्ये एका पपईने सासरच्या पाच जणांना जेलमध्ये बसवलं आहे. सुनेनं सासरच्या मंडळीविरोधात जाणूनबुजून गर्भपात करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती पपई खायाला दिलं आणि गर्भपात घडवून आणल्याची तक्रार केली होती. यावरुन विरार पोलिसांनी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली.
विरारमध्ये पपई सुनेला जबरदस्ती खायाला देणं सासारच्या माणसांना महागात पडलं आहे. सुनेनं चक्क सासरच्या पाच जणांना विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विरार पोलिसांनी याप्रकरणी सासू, सासरे, पती, दीर आणि पतीची आत्या या पाचही जणांवर गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली आहे. विरारला राहणारी फिर्यादी मोना पारेख हीच अर्पण पारेख बरोबर दहा महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरच्या माणसांबरोबर मोनाचे खटके उडत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी मोनाला आपण गर्भवती असल्याचं कळलं. तिने हे सासरच्यांना सांगितलं. सासरच्यांनी मोनाला गर्भपात घडवून आणण्यासाठी जाणूनबुजून पपई खायला दिल्याचा आरोप मोना हीने केला आहे. त्यामुळेच पोटातील बाळाचा गर्भपात झाल्याचा आरोप मोनाने विरार पोलीस ठाण्यात केली.
दरम्यान, मोनाच्या फिर्यादीवरून भारतीय दंड कलम 313 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पपईमुळे सासरची मंडळी तुरुंगात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2017 05:21 PM (IST)
विरारमध्ये पपई सुनेला जबरदस्ती खायाला देणं सासारच्या माणसांना महागात पडलं आहे. सुनेनं चक्क सासरच्या पाच जणांना विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -