कल्याण : अनधिकृत हातगाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना महिलेनं धक्काबुक्की करत चक्क मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत हातगाड्या लागत असून या गाड्यांवर काल विठ्ठलवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यादरम्यान श्रीराम चौकातील एका चायनीजच्या गाडीवर पोलीस कारवाईसाठी गेले असता तिथे निर्मला बाविस्कर या महिलेनं कारवाईला विरोध केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावर हात उगारला आणि शिवीगाळ केली.
या प्रकारामुळे कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मात्र सरतेशेवटी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. सोबतच योगेश बाविस्कर आणि गणेश बाविस्कर या तिच्या दोन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तिघांवरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ उल्हासनगरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनधिकृत हातगाडीवरील कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना महिलेची मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2018 10:48 PM (IST)
श्रीराम चौकातील एका चायनीजच्या गाडीवर पोलीस कारवाईसाठी गेले असता तिथे निर्मला बाविस्कर या महिलेनं कारवाईला विरोध केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावर हात उगारला आणि शिवीगाळ केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -