या तक्रारींची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिनकर मनवर यांना नोटीस बजावली आहे. 20 ऑक्टोबर 2018 रोजी व्यक्तिशः उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे, असे महिला आयोगाने आदेश दिले आहेत.
दिनकर मनवर यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागची मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम समितीची भूमिका स्पष्ट करणारा अहवाल 19 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी व्यक्तिशः उपस्थित राहून अथवा अध्यक्ष, अभ्यास मंडळ यांनी प्रत्यक्ष सादर करावा असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहेत.
पत्रकारालाही आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश
औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी समाज माध्यमावर महिलांविषयी अश्लील टिपणी केल्याने त्याविरोधात तक्रार करणारे अर्ज आयोगास प्राप्त झाले आहेत. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सुरेश पाटील यांना 20 ऑक्टोबर 2018 रोजी आयोगापुढे हजर रहावे असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेल विभागास तात्काळ कारवाई करावी व त्याचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश दिले आहेत.