नवी मुंबई : एबीपी माझाच्या बातमीनंतर महिलेला फासावर लटकविलेल्या आरोपींवर हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालाय. नवी मुंबईत महिलेस फासावर लटकावून मारल्याची खळबळजनक घटना समोर आली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी प्रथम आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, एबीपी माझ्याच्या बातमीत सदर महिलेला जाळून तिला फासावर लटकविण्यात आले असून तशा खुणा तिच्या शरीरावर असल्याची बातमी गुरुवारी दिली होती. यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी काल रात्री उशीरा पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले.


हत्येचा गुन्हा दाखल करेपर्यंत फरार झालेल्या आरोपींना आज(शुक्रवारी)सकाळी पनवेलमधील गावातून चार आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. एक आरोपी अल्पवयीन मुलगी आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आरोपींवर कडक कारावाई करण्याची मागणी केली आहे.

महिलेला फासावर लटकावून मारले, मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून विकृती, पनवेलमधील दुन्द्रे गावातील घटना

काय आहे घटना?
पनवेल मधील दुन्द्रे गावात ही खळबळजनक घटना घडली. मंगळसूत्र चोरले असल्याचा आरोप मयत महिलेवर आरोपींनी केला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेला गळफासावर लटकवले, असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावे आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शेजारी राहणाऱ्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. शारदा माळी यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्यांना फासावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावून लटकवून हत्या केल्याचा आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विट्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न | ABP Majha