मुंबई : रस्त्यावरील उघडी गटारं पादचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. मुंबईतल्या भांडुप परिसरात उघड्या गटारात पडून एक 65 वर्षीय महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संबंधित महिलेचा शोध सुरु असून ती जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. सुलोचना भालेराव असं त्यांचं नाव असून वीज बिल भरण्यासाठी त्या जात असताना ही घटना घडली.
संततधार पावसामुळे झाकण उघडं असलेल्या गटारात पाणी भरलं होतं. मात्र सुलोचना यांना त्याचा अंदाज आला नाही आणि त्या थेट खाली गेल्या.
मुंबईत आजही अनेक गटारांवर झाकणं नसल्यामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. काहीच दिवसांपूर्वी वसई स्थानकावर गटारावरील स्लॅब कोसळल्याने काही जण गटारात पडले होते.
वसई रेल्वे स्थानकात गटाराची स्लॅब कोसळून 15 प्रवासी जखमी