मुंबईत पावसाला जुना फॉर्म गवसला
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 12:09 PM (IST)
मुंबई : गेल्या 24 तासात मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवार सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने शनिवार सकाळ 8.30 शतक ओलांडलंय, सांताक्रुझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, तब्बल 115.2 मिमी पावसाची नोंद केली. तर कुलाबा वेधशाळेनं 58.2 मिमी पावसाची नोंद केली आहे. जून महिन्यात सरासरी 523 मिमी पाऊस पडतो, आत्तापर्यंत 380.1 मिमी पाऊस पडल्याची माहिती सांताक्रुझ वेधशाळेनं दिली आहे. येत्या आठवड्यात मुंबईत पाऊस चांगला बरसण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे.