मुंबई : संवेदनशील ठिकाणे, आस्थापने यांच्या सुरक्षेचा भार पोलिस यंत्रणेवर पडत असल्याने मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल रक्षक सुरक्षा देतात, त्यामध्ये मुंबई मेट्रोमध्ये देखील गेल्या काही वर्षापासून सुरक्षा देत होते. मात्र अचानक आता मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या जागी खाजगी सुरक्षा रक्षक पुरवल्या जाणार आहेत.


महाराष्ट्र सुरक्षा बाळातील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याचा शर्तीवर माहिती दिली की, मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बळाची सुरक्षा आता काढण्यात येणार आहे. त्या जागी खाजगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. 5 जूननंतर एमएमआरडीए मेट्रोमधून ही सुरक्षा काढणार आहे. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांकडे आता मुंबईकरांची सुरक्षा जाणार आहे.


एमएमआरडीएने महाराष्ट्र सुरक्षा बळाला तसं पत्र दिले


आर्थिक कारण देत ही सुरक्षा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. त्यानुसार अनेक ठिकाणी ही सुरक्षा पुरविली जाते, मात्र आता मुंबई-मेट्रो मधून ही सुरक्षा काढली जाणार आहे अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.


यासंदर्भात  आम्ही महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रमुखांना  आणि एम एम आर डी ए अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यासाठी नकार दिलाय. त्यामुळे मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा का ? काढून घेण्यात येतेय यासंदर्भात नक्की कारण कळलेलं नाही. त्यामुळे पुढील काळात जर मुंबई मेट्रोमध्ये खाजगी सुरक्षारक्षकांना मार्फत सुरक्षा दिली जाणार असेल, तर ते यामागचं लॉजिक काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो.