मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 7 आणि 8 जून दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 ते बुधवारी सकाळी 10 पर्यंत 24  पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनातून मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, पाणी कपातीच्या आदल्या दिवशीच आवश्यक असलेला पाण्याचा साठा ठेवावा, असंही सांगण्यात आलं आहे. 


मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत  करण्याकरता शिवडी बस डेपोसमोर 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली 600 मिलीमीटर आणि 450  मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम मंगळवार 7 जूनला सकाळी 10 पर्यंत बुधवार 8 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी कामी हाती घेण्यात येणार आहे. 


या कारणाने, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गाव, काळेवाडी, नायगाव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसर पाणीपुरवठा विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


एफ/दक्षिण विभाग :


रुग्णालय प्रभाग : के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय (24 तास पाणीपुरवठा) - ( 7 जूनला सकाळी 10 ते 8 जून सकाळी 10 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 शिवडी (पूर्व) विभाग : शिवडी फोर्ट मार्ग, गाडी अड्डा शिवडी कोळी वाडा – (7 जूनला सायंकाळी 7 ते रात्री 9.30 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 शिवडी (पश्चिम) विभागः आचार्य दोंदे मार्ग, टि. जे. मार्ग,  झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद (क्रॉस) मार्ग – (7 जून सायंकाळी 4.30 ते सायंकाळी ७7 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 गोलंजी हिल पाणीपुरवठा – 


अ) परळ गांव : गं. द. आंबेकर मार्ग 50 टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग,  नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड  – (7 जूनला रोजी दुपारी 1.45  ते सायंकाळी 4.45  वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


काळेवाडीः परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी
 (7 जून रात्री 8.30 ते रात्री 11.30 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 नायगांवः जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन – (8 जून सकाळी 7 ते सकाळी 10 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 अभ्युदय नगरः अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग  – (7 जून  मध्यरात्रीनंतर 2.15 ते सकाळी 6  वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 शिवडी वडाळा झोन : ज्ञानेश्वर नगर, जेरबाई वाडिया मार्ग  – (8 जूनला सकाळी 6.30 ते  10  ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


शहर उत्तर पाणीपुरवठा : दादर, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता – (8 जूनला सकाळी 7 ते 10 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)


शहर दक्षिण पाणीपुरवठा : लालबाग, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली ( 8 जूनला पहाटे 4 ते सकाळी 7 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)


 ई विभाग :


अ. जे. जे. रुग्णालय (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)


ब. म्हातार पाखाडी – (7 जूनला  सकाळी 6.45 ते सकाळी 9 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


क. डॉकयार्ड रोड – (7 जूनला दुपारी 12.30  ते दुपारी 3 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


ड. हाथी बाग हुसेन्नी पटेल मार्ग – ( 7 जूनला दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


इ. रे रोड – (7 जूनला  सायंकाळी 7 ते रात्री 8.30 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


फ. माऊंट रोड (घोडपदेव) – (7 जूनला रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


ग. बीपीटी – (7 जूनला रात्री 9 वाजता- ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
 
ह. नेसबीट मार्ग, माझगांव - (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


 बी विभाग :


अ) संपूर्ण बी विभाग, बाबुला टँक क्षेत्र : डोंगरी विभाग अ आणि ब – (7 जूनला रात्री 8.30 ते रात्री 10 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


ब) वाडी बंदर– (7 जून सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 5.30 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


क) मध्य रेल्वे – (7 जून सायंकाळी 7 ते रात्री  8 वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


ड) बीपीटी विभाग – (7 आणि 8 जूनला सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 5.30 वाजता आणि रात्री 11.30  ते मध्यरात्रीनंतर 1  ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).


ए विभाग : बी. पी. टी., नेव्‍हल डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगढ झोपडपट्टी, पी. डिमेलो मार्ग – ( 7 जून दुपारी 1.30 ते सायंकाळी 4 आणि रात्री 9.50 ते मध्यरात्री 2.30  वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).