मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. जानेवारी 2022 पासून आता लोकलमध्ये वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यांमध्ये प्रवाशांना वायफायचं नेटवर्क मिळणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वायफायची सुविधा देण्यात येते. मात्र, आता धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वायफायची सुविधा दिली जाणार आहे. 


दरम्यान, रेल्वेत एकावेळी जास्त प्रवासी असतात, त्यामुळे एकावेळी जास्त जणांना रेंज मिळण्यासाठी ही यंत्रणा अधिक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे उच्च क्षमतेचे वायफाय बसवण्याची मध्य रेल्वेची योजना असल्याची माहिती मिळते आहे. लोकलने प्रवास करताना (Train journey) प्रवाशांच्या मोबाईलचे नेटवर्क (mobile network) संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांना लोकलमध्ये असताना फोनवर बोलता येणे शक्य होत नाही. परिणामी, प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसविण्यात येणार आहे. मागील अनेक कालावधीपासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.


मध्य रेल्वेच्या स्थानकावर वायफायची सुविधा आहे. मात्र, आता धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वाय-फायची सुविधा दिली जाणार आहे. मध्य रेल्वेद्वारे एका खासगी कंपनीद्वारे हे काम केले जाणार आहे. कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यांत वायफाय लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डब्यात एक वायफाय लावले जात असून, काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.


रेल्वेची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवनवे उपक्रम रेल्वे प्रशासनाकडून राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून ही वायफाय सेवेचाही प्रयोग करण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, लोकलमध्ये देण्यात येणारी वायफास सुविधा वापरायची कशी, ती मोफत असणार का? याबाबत  मात्र, अधिक माहिती अजून समोर आलेली नाही. 


महत्त्वाच्या बातम्या: