मीरा रोड: पतीकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी पत्नीने स्वतःच्याच अपहरणाचा डाव रचल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील क्राईम सिरिअल पाहून प्रियंका शुक्ला या 35 वर्षीय महिनेने हे कृत्य केल्याची माहिती मिळते आहे.
प्रियंका शुक्ला ही पेशानं शिक्षिका आहे. दरम्यान याआधीही प्रियंकाने असाच बनाव आखला होता. त्यावेळी या महिलेने चिठ्ठीद्वारे आपल्या मुलाला ठार मारण्याच्या बहाण्याने नवऱ्याकडून ८० हजार रुपये उकळले होते.
रविवार २० ऑगस्ट रोजी प्रियंका शुक्लानं आपलं अपहरण झाल्याचा बनाव रचला. आपल्याच मोबाईल फोनवरून तिनं आपल्याच पतीला 'तुमच्या पत्नीला किडनॅप करण्यात आलं आहे.' असा मॅसेज पाठवला आणि त्यासोबत तिचा तोंड बांधलेला फोटोही पाठवला.
पत्नी सुखरुप पाहिजे असेल तर दहा लाख रुपये घेऊन ये. असा मॅसेजही पतीला पाठवला. यानंतर पतीने काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखत सहा विशेष पथकं तयार केली. मोबाईलचे लोकेशन घेत काश्मिरा पोलिसांनी खार, भांडुप, कल्याण, कर्जत, मुंबई या परिसरात तपासही सुरु केल. अखेर एका रेल्वे स्थानकावर ती सीसीटीव्हीत दिसली आणि हा बनाव असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. मिरा रोड रेल्वे अखेर पोलिसांच्या एका पथकाने प्रियंकाला पकडले. खोटे बनाव रचून पैसे उकळणाऱ्या या महिलेला अटक करण्यात आली आहे.