हेडलाईन्स
--------------
1 महाराष्ट्रातलं एकही गाव पाण्याखाली जाणार नाही, तेलंगणाशी मेडिगट्टा करार करताना मुख्यमंत्र्यांचा दावा, 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
---------------
2 कोकणची वाहतूक एक्स्प्रेस वेनं वळवली तरच टोलमुक्ती, अवघ्या काही तासात केसरकरांचं एक पाऊल मागे, नितेश राणे कोकणवासियांसाठी आंदोलनाच्या तयारीत
------------
3 महाराष्ट्र सदनातल्या अजागळ कारभाराचा सुधीर मुनगंटीवारांना फटका,
अमराठी स्टाफनं मुनगंटीवाराना ओळखलं नाही, संतापलेल्या अर्थमंत्र्याची स्टाफविरोधात लेखी तक्रार
------------------
4 मुंबईत वांद्रेमध्ये वाहतूक पोलिसावर रॉडने हल्ला, हल्ल्यात पोलीस कर्मचारी विलास शिंदे गंभीर जखमी, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
------------------
5 18 एप्रिलपासून बेपत्ता असणाऱ्या जय वाघाचा तपास सीबीआयकडे सोपवा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी
--------------------
6 हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज काश्मीरची पाहणी करणार, गेल्या अनेक दिवसांपासूनचं काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरण जैसे थे...
-----------
7 देशातल्या 5 राज्यांमध्ये पुराचा प्रकोप, 50 लाखहून अधिक जणांना पुराचा फटका, मदतीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली मोदींची भेट
--------------
8 कांस्यपदक विजेती पैलवान साक्षी मलिक मायदेशी परतली, साक्षीच्या स्वागतासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यासह अनेकांची हजेरी
------------
9 क्रीडा संघटनांवर कब्जा करणाऱ्या नेत्यांना बाजूला करा, ऑलिम्पिकनंतर माजी क्रीडापटूंची मागणी, खेळाडूंच्या सुविधा आणि नियोजनावर नाराजी
-------------------------
एबीपी माझा वेब टीम