मुंबई : 25 वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईकरांची दैना होते. लोकांचा जीव जातो आणि काही लोक बेपत्ताही होतात. अर्थात हे सगळं होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती केली जाते. तरीही यावर्षी काल एका दिवसाच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. याचविषयी सवाल उपस्थित केल्यानं उद्धव ठाकरेंना मात्र भलताच राग आला.

‘मुंबईत नीट कामं झाली आहेत. आता तुम्ही फक्त पावसाला येऊ नको असं सांगा’, असं अजब उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं.

उद्धव ठाकरेंचा पारा का चढला?

प्रश्न : पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे?

उद्धव ठाकरेंचं उत्तर : तुम्ही पाऊस थांबवा, तुम्ही पाऊस थांबवा... हेच उत्तर आहे. मग तुमचा उपाय सांगा, पाऊस कसा थांबवायचा?, आम्ही काय केलं ते मी सांगतो. तुम्ही असं समजू नका की, मुंबईचा ठेका तुम्ही घेतलेला आहे. हे कृपा करुन समजू नका. आम्ही सुद्धा जनतेला बांधिल आहोत. तुम्ही म्हणजे जनता असं समजू नका. जनतेची सेवा करतो म्हणूनच जनतेनं वारंवार आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. जनतेची सेवा कशी करायची आहे ती आम्ही करतो आहोत. असं अजिबात समजू नका की, आमचा आणि जनतेचा अजिबात संपर्क नाही. तुमच्याही पेक्षा जास्त आमच्या शिवसैनिकाचा संपर्क जास्त आहे. तो काल जेवढा घराघरात गेला तेवढे तुम्ही गेले नव्हतात.

दरम्यान, नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी त्याला तोंड देण्यासाठी पालिकाही सज्ज नाही, हे वास्तव उद्धव ठाकरेंना पचलेलं दिसत नाही.

काल (मंगळवार) मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. याचबाबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली.

VIDEO :



संबंधित बातम्या :

काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे

मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू

मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू