मुंबई : संग्राम कोते पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीतील एखाद्या नेत्याच्या मुलाला ही संधी मिळणार की सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपदाचा मान जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
संग्राम कोते पाटील यांच्या राजीनाम्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांपैकी मीडिया प्रभारी सुरज चव्हाण, पुण्याचा रविकांत वरपे, बीडचा मेहबूब शेख यांची नावं चर्चेत आहेत. नेत्यांच्या मुलांमध्ये माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा अजिंक्य राणा पाटील, आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांची नावंही शर्यतीत आहेत.
पक्षाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? नेत्याचा पुत्र की सामान्य कार्यकर्ता?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2019 10:34 AM (IST)
संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली आहे. सामान्य कार्यकर्त्यांपैकी मीडिया प्रभारी सुरज चव्हाण, पुण्याचा रविकांत वरपे, बीडचा मेहबूब शेख यांची नावं चर्चेत आहेत.
फोटोमध्ये : सुरज चव्हाण (डावीकडे वर), रविकांत वरपे (उजवीकडे वर), मेहबूब शेख (डावीकडे खाली), विक्रांत जाधव (उजवीकडे खाली)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -