मुंबई : मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहे. मराठी भाषिक मतदारसंघात शिवसेनेसोबत भाजपचं प्राबल्य वाढताना 2014 मधील निवडणुकांमध्ये दिसलं. त्यामुळे युती झाली, तर शिवसेनेच्या काही जागांवर भाजपचा, तर भाजपच्या काही जागांवर शिवसेनेचा डोळा आहे.


मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत भाजपचे तीन, तर शिवसेनेचे तीन खासदार आहेत. पण विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र वेगळं आहे.

दक्षिण मुंबईत शिवसेनेला फक्त दोन जागा जिंकता आल्या, तर भाजपलाही दोन जागांवर यश आलं होतं. त्यामुळे यंदा कुलाबा विधानसभा म्हणजे राज पुरोहितांच्या जागेवर शिवसेनेचा डोळा आहे. राज पुरोहित यांच्या विरोधात पांडुरंग सकपाळ यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.

1) कुलाबा - राज पुरोहित (भाजप)/ शिवसेनाचा दावा
2) मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजप)

1) वरळी - सुनिल शिंदे (शिवसेना)/ भाजपचा दावा
2) शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)/ भाजपचा दावा

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर भाजपचा एकच आमदार आहे. या भागात असलेल्या वडाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. सध्या शिवसेनेने इकडे जोरदार तयारी केली आहे. पण कोळंबकर भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकरांच्या विरोधात माजी महापौर श्रद्धा जाधव यांना तयारी करण्याचे आदेश शिवसेनेने दिले आहेत.

1) सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)

1) माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)/ भाजपचा दावा
2) चेंबुर - प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
3) अणुशक्तिनगर - तुकाराम काते  (शिवसेना)

ईशान्य मुंबईत शिवसेनेचे दोनच आमदार आहेत. या भागात भाजपचे राम कदम आमदार आहेत. त्यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना या जागेवर आपला दावा करु शकते. तशी तयारी या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने सुरु केली आहे. राजा राऊत या विभागप्रमुखाला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

1) मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप)
2) घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) / शिवसेनेचा दावा

1) विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना)
2) भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना)

उत्तर मुंबई या भागातील सहा विधानसभांपैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. या भागात मुख्यत्वे गुजराती, जैन आणि उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या भागात शिवसेनेला आपलं प्राबल्य मिळवायचं असेल तर एखादी जागा जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे दहिसरच्या जागेवर शिवसेना दावा करु शकते

1) मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)

1) बोरिवली - विनोद तावडे (भाजप)
2) चारकोप - योगेश सागर (भाजप)
3) दहिसर - मनिषा चौधरी (भाजप)
4) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप)

उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या खासदार पूनम महाजन असल्या, तरी तीन विधानसभेत शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे या भागात भाजप कुर्ल्याच्या जागेवर सध्या तयारी करत आहे.

1) कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना)
2) कलिना - संजय पोतनीस (शिवसेना)
3) वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत (शिवसेना)

1) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप)
2) विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप)

उत्तर पश्चिम भागात शिवसेना आणि भाजपची ताकद समान आहे पण गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सुभाष देसाईंचा पराभव करत भाजपच्या विद्या ठाकूर यांनी बाजी मारली होती. आता याच मतदारसंघातून खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.

1) अंधेरी पूर्व - रमेश लटके (शिवसेना)
2) जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर (शिवसेना)
3) दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना)

1) वर्सोवा - भारती लवेकर (भाजप)
2) अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)/ शिवसेनाचा दावा
3) गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजप) / शिवसेना दावा

मुंबई विभाग : एकूण जागा 36

शिवसेनेचे एकूण आमदार - 14
भाजपचे एकूण आमदार - 15

भाजपचे आमदार

कुलाबा- राज पुरोहित (भाजप)/ शिवसेनाचा दावा

मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजप)

घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)

वांद्रे पश्चिम - आशिष शेलार(भाजप)

घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) / शिवसेनेचा दावा

बोरिवली - विनोद तावडे (भाजप)

मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप)

चारकोप - योगेश सागर (भाजप)

दहिसर - मनिषा चौधरी (भाजप)

कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप)

गोरेगाव - विद्या ठाकूर ( भाजप)/ शिवसेनेचा दावा

वर्सोवा - भारती लवेकर (भाजप)

अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)/ शिवसेनेचा दावा

विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप)

सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)

शिवसेनेचे आमदार

चेंबूर - प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)

कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना)

कलिना - संजय पोतनीस (शिवसेना)

अंधेरी पूर्व - रमेश लटके (शिवसेना)

जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर (शिवसेना)

वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत (शिवसेना)

दिंडोशी - सुनील प्रभू (शिवसेना)

माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)/ भाजपचा दावा

वरळी - सुनिल शिंदे (शिवसेना)/ भाजपचा दावा

शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)/ भाजपचा दावा

अणुशक्तिनगर - तुकाराम काते (शिवसेना)

विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना)

भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना)

मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)