कुठेकुठे निषेध ?
- ठाण्यात जतन गोविंदा पथकाकडून तोंडात मोजपट्टी धरुन दहीहंडी
- दादरला महिला गोविंदांची अनोखी 'चक्रीहंडी'. हंडी फोडण्यासाठी चार फिरत्या थरांची थरारक कसरत. छोट्या बालगोविंदाने फिरत्या चक्रीथरांवर चढून फोडली हंडी.
- भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारांची हंडी फोडली
- दादरमध्ये शिडीने दहीहंडी फोडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध
- दादरमध्ये जय हनुमान मंडळाचे जमिनीवर झोपून 9 थर
- जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली
-
कुठे नियम मोडले ?
- गोरेगावच्या गांवदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी. उंचीची मर्यादा आणि वयाची मर्यादा यांचा भंग
- डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने 5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त सलामी दिली