1.    अमेरिकेच्या लास वेगास शहरात मृत्यूचं तांडव, म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार, 50 मृत्यूमुखी, 100 जण जखमी, एका हल्लेखोराचा खात्मा https://goo.gl/PwwnCd


2.    नारायण राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं वक्तव्य https://goo.gl/rW7iG3, तर राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार, सूत्रांची माहिती https://goo.gl/mDqJkQ

3.    सैन्यात भरती व्हा, देशी दारुऐवजी इंग्लिश दारु प्यायला मिळेल, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर दलितांना सैन्यात आरक्षणाची मागणी https://goo.gl/9feLSz

4.    एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या रात्री ब्राझील टीमसोबत मेजवानी नव्हे, फक्त भेट, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचं स्पष्टीकरण, आशिष शेलारांवरही टीका https://goo.gl/UK1Bco

5.    गांधी जयंतीनिमित्त प्रशासनाकडून गावा-गावात 'चावडी वाचना'चा फार्स, पारदर्शक कर्जमाफीच्या नावाखाली फक्त याद्या वाचून दाखवल्या http://abpmajha.abplive.in/

6.    मुंबईत बड्या सोसायट्यांमधील 100 किलोंपेक्षा जास्त कचरा उचलणार नाही, महापालिकेचा निर्णय, इमारतीच्या आवारातच प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचेही आदेश https://goo.gl/gc2Qps

7.    कचरा नाही तिथे स्वच्छता अभियान, पुण्यात महापौर मुक्ता टिळक, तर कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांकडून फक्त झाडू मारण्याचा सोपस्कार https://goo.gl/otYqHD

8.    जायकवाडी धरण फुल्ल, तरीही औरंगाबादकरांना तीन दिवसांआड पाणी पुरवठा, शहरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही https://goo.gl/HhHsFa

9.    नागपुरात पोलिस पतीकडून वकील पत्नीची राहत्या घरात जाळून हत्या, आरोपी पतीकडून पत्नीच्या आत्महत्येचा बनाव, चिमुकल्यांच्या जबाबामुळे प्रकरण उजेडात https://goo.gl/qUR1rM

10.    साताऱ्याहून कास पठाराकडे जाणारा यवतेश्वर घाट माथ्यावरचा रस्ता खचला, वाहतूक बंद, पर्यटक अडकले https://goo.gl/tTYuwF

11.    महाराष्ट्राचं लोकदैवत खंडेरायाच्या जेजुरीत रंगला मर्दानी दसरा, 42 किलोंची खंडा तलवार उचलण्यासाठी स्पर्धा https://goo.gl/Vgrpyo

12.    अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार, इंटरनल बायलॉजिकल क्लॉकमधील संशोधनासाठी जेफ्री हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल यंग यांचा गौरव https://goo.gl/uB5eEU

13.    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, नेहरा आणि दिनेश कार्तिकचं पुनरागमन, तर शमी,  उमेश यादवला डच्चू https://goo.gl/3jEdJK

14.    चार्जिंग करताना ‘आयफोन 8 प्लस’ फुटला, तैवान आणि जपानमधील घटनेने आयफोनप्रेमींमध्ये खळबळ, ‘अॅपल’कडून चौकशी सुरु https://goo.gl/c6tDoK

15.    वरुण धवनच्या ‘जुडवा 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसात 59 कोटींचा गल्ला, पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा यंदाचा तिसरा सिनेमा https://goo.gl/AN1g1d

माझा विशेष : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : पुलावर 'त्या' क्षणी नेमकं काय घडलं? मरणाच्या दारातून बचावलेल्या मुंबईकरांची आपबिती, पाहा रात्री 9.15 वाजता

BLOG : राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचा ब्लॉग - बेशरम बेपर्वाई, निष्पापांचे हकनाक बळी ! https://goo.gl/PZGFGm

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - रेड लाईट डायरीज - 'रॅकेट' रेडलाईट एरियाचे... https://goo.gl/A8gj5c

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर