मुंबई : मुंबईतल्या विक्रोळी परिसरात मराठी पाट्यांसाठी निवेदन देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आज (सोमवार) राज ठाकरेंच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली.
मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर मनसेही सध्या चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता मनसेनं देखील फेरीवाल्यांसह अनेक विषयाबाबत महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेतले.
पनवेलमधील कामोठ्यात मनसैनिकांची फेरीवाल्यांना मारहाण
नेमकं काय ठरलं या बैठकीत?:
- शुक्रवारपासून मुंबईत पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावानिशी पत्र पाठवण्यात येणार आहे.
- फेरीवाले, मराठी पाट्या आणि बँकांमध्ये मराठी व्यवहारासाठी ही पत्रं वाटण्यात येतील.
- जर संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा निर्णय कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
फेरीवाल्याच्या मारहाणीनंतर मनसेची ‘कृष्णकुंज’वर तातडीची बैठक
एकीकडे ही तातडीची बैठक सुरु असताना दुसरीकडे पनवेलमधील कामोठेमध्ये मनसैनिकांचा तेथील फेरीवाल्यांना तुफान मारहाण केली. तसंच तेथील अनधिकृत स्टॉलची तोडफोडही केली. त्याचबरोबर अनेक गाडेही उधळून लावले. त्यामुळे आता या सर्व गोष्टींबाबत मनसेही अधिक आक्रमक झाली आहे.
दरम्यान, काल रात्री विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी काँग्रेसच्या अब्दुल अन्सारी आणि रिझवान नावाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर
नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
हल्ला करणारे दोन फेरीवाले मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून दिले
मनसेच्या ‘कृष्णकुंज’वरील तातडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2017 09:15 PM (IST)
जर संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा निर्णय कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -