मुंबई : मुंबई हायकोर्टाने गणपती विसर्जनावेळी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेच्या उपाययोजनाबद्दल राज्य सरकारला विचारणा केली आहे. सरकारने गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांसाठी काय उपाय आखले आहेत याबद्दलही सरकारला सवाल केला आहे.


 

अनंत चतुर्दशीला चौपाटीवर तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेवरही हायकोर्टाने ताशेरे ओढले. समुद्र किनाऱ्यावर बुडून होणाऱ्या मृत्यूंबाबतही हायकोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातानंतरही राज्य सरकार गंभीर नसल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.

 

समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेबद्दल जनहित मंचाने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला गुरुवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.