मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणे आणि भाजपच्या निष्ठावंतांवर मात करुन उमेदवारी मिळवणारे प्रसाद लाड सध्या बरेच चर्चेत आहेत. मात्र, याच वेळी त्यांच्या संपत्तीबाबतही बरीच चर्चा सुरु आहे.


विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून मैदानात उतरलेल्या प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती तब्बल 210 कोटी 62 लाख असल्याचे समोर आलं आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.

प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?

जंगम मालमत्ता : 47 कोटी 71 लाख रुपये

- एकूण जंगम मालमत्तांपैकी 39 कोटी 26 लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरुपात गुंतवणूक केलेली आहे.

- लाड यांची पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख

- मुलगी सायलीकडे 11 कोटी 15 लाख

- मुलगा शुभम याच्याकडे 28 लाख 28 हजार रुपये



स्थावर मालमत्ता : 55 कोटी 86 लाख

- एकूण स्थावर मालमत्ता पैकी पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीत सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत.

- पत्नी निता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवासी इमारत या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.

- याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी 10 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे.



प्रसाद लाड आणि कुटुंबीयांवर नेमकं कर्ज किती?

- त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्यावर 41 कोटी 48 लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे 42 कोटी 21 लाखाचे कर्ज आहे. मुलगी सायली हिच्या नावे 1 कोटी 7 लाख तर मुलगा शुभम याच्या नावे 18 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज आहे.

- प्रसाद लाड यांनी 2016-17 या वर्षात चार कोटी 22 लाख रुपये इन्कम टॅक्स भरला आहे. तर पत्नीने 1 कोटी 84 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संंबंधित बातम्या :

निष्ठावंत माधव भांडारींऐवजी 'लाड' यांना उमेदवारीचा 'प्रसाद' का?

तिकीट मिळालं असतं तर मीच जिंकलो असतो : राणे


संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!

विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी