मुंबई: भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अद्यापही कायम आहे. किंबहुना त्यांच्यातील दुरावा पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे युती तुटण्याची चिन्ह दिसू लागल्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, युतीच्या तिसऱ्या चर्चेमध्ये बरंच काही घडलं. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत फारच तणाव दिसून आला.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नेमकं काय घडलं? यावर एक नजर:  

* तिळगूळ देऊन सुरुवात झालेल्या युतीच्या बैठकीतला गोडवा तिसऱ्या टप्प्यापर्यंत कडवट झाला. कारण या बैठकीत भाजपच्या एका प्रतिनिधीने शिवसेनेतील प्रतिनिधीला हातसुद्धा मिळवण्यास नकार दिला (उपरोधिकपणे). 'आम्ही कलंकित आहोत. त्यामुळे आमच्याशी हातमिळवणी का करता?' असा सवाल त्यांनी सेना नेत्यांना विचारला. 'तेव्हा कोळशाच्या धंद्यात आमचे हात काळे झाले तर हरकत नाही.' असा टोला सेना नेत्याकडून लगावण्यात आला.

* दोघांनी आपापले प्रस्ताव समोर ठेवले. भाजपचा 114 तर शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव होता. मागच्या वेळेस 63 जागांवर लढलेल्या भाजपला त्याही पेक्षा कमी म्हणजे 60 जागांचा प्रस्ताव पाहताच भाजप नेत्यांनी तो अमान्य केला. सेनेने भाजपच्या प्रस्तावाला प्रस्तावानेच उत्तर द्यायचं ठरवलं होतं.

* भाजपची ताकद वाढली असताना कमी जागेचा प्रस्ताव का? अशी विचारणा झाली असता 'आमची पण ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्हालाही जागा वाढवून द्या.' अशी सेनेनं उलट मागणी केली.

* 2014च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या लीडवर जागावाटप नाही तर, मागच्या सर्व निवडणुकांच्या सरासरीवर जागांची मागणी व्हावी. अशी मागणी शिवसेनेने केली.

* यावर प्रस्तावच अमान्य असल्याने त्याची अदलाबदल झालीच नाही.  आता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊ द्या. असा सूर दोन्ही बाजूने आला. त्यामुळे युतीची तिसरी बैठकही निष्फळ ठरली.

संबंधित बातम्या:

LIVE: युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव