ठाणे : ठाण्यात पालिका निवडणूकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. आज दुपारी नारायण राणेंच्या घरी ठाण्यातील युतीवर चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. त्या बैठकीत ठाण्यात आघाडी होण्याचे संकेत दिले आहेत.


नारायण राणेच्या निवासस्थानावर आज दुपारी ठाण्यातील आघाडीवर चर्चेसाठी बैठक ठेवण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या दोघांमध्ये ठाण्यातील आघाडीवर बराच वेळ चर्चा सुरु होती. अखेर चर्चा सकारात्मक झाली असून ठाण्यात आघाडी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

ठाण्यासह कळवा मुंब्रा भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्याठिकाणी काँग्रेसला जागा देण्याची तयारी राष्ट्रवादीनं दाखवली आहे. आता दोन्ही पक्षांची उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे पुढील निर्णय घेणार आहेत. त्यानंतर यादी जाहीर करण्यात येणार आहे.