आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यापूर्वी रामदार कदमांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ''मुंबईचे भाजप अध्यक्ष आणि खासदारांना भाजपनं शिवसेनेवर भुकंण्याचं काम दिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष्य द्यायला आम्हाला वेळ नाही,'' असे ते म्हणाले.
भ्रष्टाचारासंदर्भातील मुद्यावर बोलताना कदम म्हणाले की, ''कोणच्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे घरी जावं लागलं, कोणाच्या नगरसेवकावर बलात्काराचे आरोप होत आहेत. याची माहिती सर्वांनाच आहे. म्हणून मी हसतो लोकाला आणि शेंबूड माझ्या नाकाला,'' अशा शब्दात कदम यांनी भाजपवर टीका केली.
तसेच उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करु नये अशी आपण विनंती केली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाय मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, रामदास कदम यांच्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'माझा कट्ट्या'वर बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्राण्यांची सर्कस नाही, आणि ते पर्यावरण मंत्री आहेत, वनमंत्री नाहीत, असा टोलाही शेलार यांनी यावेळी लगावला.
व्हिडीओ पाहा