मुंबई पश्चिम रेल्वेवरील (Western Railway)  मालाड (Malad)  हे स्थानक अतिशय महत्त्वाचे असून त्या ठिकाणी सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी आज दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक (Mega Block)  घेण्यात येत आहे. हा जम्बो मेगाब्लॉक गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांच्या दरम्यान असेल. या मेगाब्लॉकमुळे आज रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या लोकल या कांदिवली आणि गोरेगावच्या (Kandivali To Goregoan)  दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मात्र हा मेगाब्लॉक पूर्ण झाल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. 


काय होणार बदल ? 



  • 1 सप्टेंबरपासून - सध्या फलाट क्रमांक 1 वरील विरार दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमधील पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. आता डब्यातील पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागणार आहे.

  • 8 सप्टेंबरपासून – चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेच्या दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. 

  • 22सप्टेंबरपासून – विरार दिशेला जाणाऱ्या जलद लोकलच्या पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागेल.

  • 29 सप्टेंबरपासून -चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे.


मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक


मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे मुख्य मार्गिका


कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर


कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55  वाजेपर्यंत


परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकलना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल


हार्बर रेल्वे


कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर


कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत


परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील.


हे ही वाचा :


लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, चिमुकल्याला सांभाळायला गेली; अन् इकडे 6 वर्षाच्या मुलीचा बेल्टला फास लागून मृत्यू