ठाण्यात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2018 09:20 AM (IST)
पाणी पुरवठा बुधवार दिनांक 4 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 5 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
ठाणे : ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवार सकाळपासून 24 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 4 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 5 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासांसाठी बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी 9.00 पासून रात्री 9.00 पर्यंत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसरात पाणी पुरवठा बंद राहील. बुधवारी रात्री 9.00 ते गुरुवार सकाळी 9.00 पर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील.