ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडून देखील पाणी पातळी घटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या या जलाशयांमधून मुख्यतः मुंबई महानगरपालिकेची तहान भागवली जाते. भातसा, मोडक सागर, तानसा धरणांमध्ये असलेल्या पाणीपातळी घटत चालली आहे.

परिणामी पुढील दोन महिन्यांत मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये महत्वाच्या भातसा, मोडक सागर, तानसा, बारवी, बदलापुर बंधारा या आणि इतर धरणांमध्ये गेल्यावर्षी याच तारखेला असलेल्या पाणी पातळी पेक्षा यावर्षी कमी पाणी पातळी दिसून आली आहे.

कोणत्या धरणामध्ये किती पाणीसाठा?

भातसा : गेल्यावर्षी ४५२.७६ दलघमी पाणीसाठा,  यावर्षी ४४२.४७ दलघमी साठा

मोडक सागर : गेल्यावर्षी ७१.०८ दलघमी पाणीसाठा, यावर्षी ५५.०४  दलघमी पाणीसाठा

तानसा : गेल्यावर्षी ५६.८७ दलघमी पाणीसाठा, यावर्षी ४१.३५ दलघमी पाणीसाठा

बारवी : गेल्यावर्षी ११३.८१ दलघमी पाणीसाठा, यावर्षी १११.४९ दलघमी पाणीसाठा