Water Cut in Mumbai : मुंबई: मुंबईकरांसाठी (Mumbai News) मोठी बातमी. मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी जपुन वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) करण्यात आलं आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या आवारातील 1200 मिलीमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या दुरुस्तीच्या कामामुळं मुंबईच्या जी दक्षिण विभागात काही ठिकाणी आज पहाटे 4.30 ते 7.30 या वेळेत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ या भागांत आज सकाळच्या सुमारास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिस्मातील फोर्टिस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कारणास्तव आज, शुक्रवारी सकाळी 11.30 ते शानिवार सकाळी 11.30 या वेळेत घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील 1200 मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय वॉल्व्हला बुधवारी रात्री गळती सुरू झाली असून दुरुस्तीसाठी शुक्रवार, 24 से रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, दिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ तसेच दादरच्या काही भागातील पाणीपुरवठा पहाटे 4.30 ते सकाळी 7.30 दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.


कोणत्या भागांत आज पाणीपुरवठा बंद? 


एन विभाग विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय (मध्यरात्रीनंतर ३3.30 ते सकाळी 11.30 नंतर) येथे 25 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील. एस विभाग नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) या परिसर, टागोरनगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व), मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर, सीएट टायर मार्गलगतचा परिसर, गाव रोड, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, सौनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्गलगतचा परिसर


टी विभाग - मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग नहूर गाव या ठिकाणी 24 तास पाणी बंद राहणार आहे. 


दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून आणि काटकसरीनं वापरावं, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच, प्रशासनाला सहकार्य करावं, असंही आवाहन मुंबई मनपानं केलं आहे.