Waris Pathan Mira Bhayandar : एमआयएमचे नेते वारिस पठाण (Waris Pathan) सोमवारी (दि.19) मीरा भाईंदर शहरात येणार होते. मात्र, त्यांना शहरात येऊ न देता मीरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरात अडवण्यात आले आहे. त्यांना मीरा भाईंदर हद्दीत प्रवेश न दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून विरोध दर्शवला. दरम्यान, वारिस पठाण यांना दहिसर चेक नाका येथून  त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस बंदोबस्तात दहिसर पोलीस ठाणे येथे घेवून जाण्यात आले आहे. पठाण यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मीरा भाईंदर (Mira Bhayandar) वसई विरार पोलीस आयुक्तल्याच्या मार्फत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


पठाण यांना पोलिसांनी बजावली होती नोटीस 


गेल्या महिन्यात मीरा भाईंदर शहरात हिंसक प्रकार घडला होता. भाजप नेते टी राजा यांचा दौरा रद्द केल्यानंतर पोलिसांनी एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनाही नोटीस बजावली होती. दरम्यान, नोटीस बजावण्यात आल्यानंतर पोलिसांना याबाबत जाब विचारेन अशी प्रतिक्रिया पठाण यांनी दिली होती. तेलंगणातील भाजप नेते टी राजा यांनी घोषणा केली होती की, ते शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी मीरा भाईंदर शहरात जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, टी राजा यांच्या दौऱ्याला पोलिसांनी परवानगीच दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला होता. त्यानंतर पोलिसांनी वारिस पठाण यांनाही देखील दौरा करण्यापूर्वी नोटीस बजावली होती. 


 मीरा रोड येथे काय घडलं होतं?


राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावेळी संपूर्ण देशाभरात उत्सहाचे वातावरण होते. याच काळात मीरा रोड येथे दोन गटात हाणामारी झाली होती.   जय श्री रामचा जयघोष करणाऱ्या तरुणांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना ताब्यात घेतलं होते. शिवाय,अनुचित प्रकार घडू नये यासाठी नयानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  दोन गटात तणाव निर्माण झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. दरम्यान, आता प्रक्षोभक बोलणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावत दौरे रद्द करण्यात सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Politics: "उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात, लवकरच एकनाथ शिंदेंचं नेतृत्त्व स्वीकारतील"