मुंबई: प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही एबीपी माझानं प्रयत्न केला आहे.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत?, तसंच विरोधकांनाही नेमका कसा विकास हवा आहे हे जाणून घेण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला आहे.आज दिवसभर तुम्ही माझावर ‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ कार्यक्रम पाहू शकणार आहात. तेव्हा चुकवू नका दिग्गजांचं विकासाचं व्हिजन.



व्हिजन पुढच्या दशकाचं या कार्यक्रमात राजकीय, आर्थिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज आपलं व्हिजन महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. तर कला आणि उद्योग जगतातील दिग्गज लोकंही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

'व्हिजन पुढच्या दशकाचं'च्या कार्यक्रमाची रुपरेषा:

कार्यक्रमाचं उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपलं व्हिजन मांडतील

अशोक चव्हाण हे आपलं व्हिजन महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवतील

सुप्रिया सुळे आपलं व्हिजन