VIDEO : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर नारळाचं झाड कोसळलं
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2017 09:57 PM (IST)
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली.
मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली. कांचन दास असं अपघातग्रस्त महिलेचं नाव आहे. ती चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात राहणारी आहे. सकाळी वॉकला जात असताना झाड तिच्या अंगावर कोसळलं. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. काही रहिवाशांनी तिला तात्काळ एक खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. पाहा व्हिडिओ :