मुंबई : देश तोडण्याच्या धमक्या देणारा कन्हैया पीएचडी करुन डॉक्टर झाल्यावर रुग्णांची सेवा कशी करणार, असं वक्तव्य करत वीरसेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी आपल्या अगाध ज्ञानाचं दर्शन घडवलं आहे.
'देश तोडण्याच्या धमक्या देणारा कन्हैया पीएचडी करुन डॉक्टर बनत आहे. मात्र मला समजत नाही, हा असला डॉक्टर पेशंटची काय सेवा करणार, त्यांना कसा तपासणार, कसे ऑपरेशन करणार?' असे अकलेचे तारे समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वीरसेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी तोडले.
कन्हैया कुमारच्या नागपूर दौऱ्यावरुन मोठं घमासान झालं होतं. अभाविप आणि बजरंग दल या संघटनांचा कन्हैयाच्या कार्यक्रमाला विरोध असताना डाव्या संघटनांनी मात्र हा कार्यक्रम करण्यावर ठाम भूमिका घेतली होती. तर मनसेचे नेते प्रशांत पवार यांनी कन्हैयाला थेट जेवणाचंच निमंत्रण दिलं.