मुंबई: मीरारोडमधील बनावट कॉलसेंटर प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे ठाणे पोलिसांनी एक नवा खुलासा केला आहे. बनावट कॉल सेंटरचा मास्टरमाईंड सागर ठक्करशी क्रिकेटर विराट कोहली कनेक्शन समोर आलं आहे.
कारण विराट कोहलीनं त्याची आलिशान ऑडी कार सागर ठक्करलाच विकली. ठाणे पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीनं ऑडी-आर 8 ही कार अडीच कोटी रुपयांना आरोपी सागर ठक्करला विकली होती.
विराटकडून विकत घेतलेली कार सागर ठक्करनं त्याच्या प्रेयसीला भेट दिल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.