जोसेफ तुस्कानो यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र जोसेफ हे वसई-विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांचे पती आहेत.
नालासोपारा पश्चिम येथील नाळेराजोडी परिसरात जोसेफ तुस्कानो आणि त्याच्या साथीदारांनी अनधिकृत इमारत बांधली. आपल्या पती महाशयाच्या कारनाम्याची मेरी तुस्कानो यांना नक्कीच कल्पना असणार.
खरं तर सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या मेरी यांनी पतींना रोखणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी त्यांनी पतीच्या काळ्या धंद्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे.
अनधिकृत इमारतीतले फ्लॅट विकण्यासाठी जोसेफ तुस्कानोनं बनावट कागदपत्रं तयार केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मात्र आपल्या गुन्हेगार पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेरी तुस्कानोवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी होत आहे. कारण गुन्हेगाराला वाचवणाराही गुन्हेगारच असतो.