मुंबई : मुंबईकर महिलांचा लोकल प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेकंड क्लास लेडीज डब्यातही आता कुशन सीट्स बसवली जाणार आहेत.

सध्या केवळ लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातच कुशन सीट आहेत. तर सेकंड क्लासमधील सीट या फायबरपासून बनलेल्या आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे प्रवासासंदर्भात संसदीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला.

सुरुवातीला आठ लोकलमध्ये कुशन सीट्स बसवण्यात येणार आहे. प्रत्येक डब्यात कुशन सीट्स बसवण्यासाठी एका लोकलमागे अंदाजे साडेपाच लाखल रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सीट बसवण्याचा एकूण खर्च अंदाजे 44 लाख येईल.

या सीट फोमपासून तयार केली असून त्यावर कृत्रिम चामड्याचं कव्हर असेल.