पावसाचं सावट दूर, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2016 05:18 PM (IST)
मुंबई : एकीकडे भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन महाभारत सुरु असलं तरी मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याचीही उत्सुकता आहे. शिवाय येत्या चार महिन्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष असेल. मंगळवारी म्हणजेच 11 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर भव्य आणि आकर्षक व्यासपीठ उभारण्यात येत आहे.