व्हायरल सत्य : मुंबईच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात डॉल्फिन?
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2017 09:21 PM (IST)
मुंबईच्या समुद्रातील डॉल्फिनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं व्हायरल झाल्यानंतर ‘माझा’नं त्याची पडताळणी करण्याचा प्रयत्नही केला.
मुंबई : मुंबईत सध्या काही नवे पाहुणे दाखल झाले आहेत. हे पाहुणे म्हणजे चक्क डॉल्फिन आहेत. मुंबईच्या समुद्रातील डॉल्फिनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं व्हायरल झाल्यानंतर ‘माझा’नं त्याची पडताळणी करण्याचा प्रयत्नही केला. मुंबईच्या समुद्रातील डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ खरंच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरचा आहे का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हिडीओत दिसणारा परिसर हा मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातला असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे हा किनारा मुंबईचाच आहे यात शंका नाही. पण समुद्रात दिसणारे हे डॉल्फिन खरंच आहेत का? याचाच शोध घेण्यासाठी आम्ही त्याच भागातल्या मच्छिमारांना भेटलो. मच्छिमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना हे डॉल्फिन आजवर अनेकदा दिसले आहेत. पण मुंबईच्या किनाऱ्यावरुन मात्र हे सहसा दिसत नाहीत. पण मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन दिसणं ही अभूतपूर्व घटना आहे. आजपर्यंत हे असे डॉल्फिन पाहण्यासाठी मुंबईकरांना किमान कोकणात, गोव्याला... किंवा अगदी परदेशात जावं लागायचं. पण डॉल्फिनच आता मुंबईकरांच्या भेटीला आल्यानं मुंबईकरांसाठी ही खास पर्वणीच म्हणावी लागेल. VIDEO :