आकाश अंबानी यांच्या विवाहाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून, कोणतीही पत्रिका छापलेली नाही, असं 'रिलायन्स'ने सांगितल्याचं 'टाइम्स नाऊ'च्या वेबसाईटवरील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
'आकाश अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका' अशा नावाने या पत्रिकेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडिओत सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका दिसत होती.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या दिवशीच सोशल मीडियावर आकाश अंबानीची कथित पत्रिका व्हायरल झाली. मात्र ही पत्रिका म्हणजे अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.