मुंबई : महाराष्ट्रातील अनेक शहरात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात भीतीचे वातावरण असताना, मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा आहे. मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता असून, आगामी काही दिवस नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांमध्ये घट झालेली दिसून येते आहे. या महिन्यातील आकडेवारीनुसार, मुंबईत लेप्टोने 1, तर डेंग्यूमुळे 5 रुग्ण दगावले. गेल्या वर्षी या महिन्यात लेप्टोने 3 तर डेंग्यूमुळे 12 रुग्ण दगावले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजार वाढलेले नसले, तरीही या साथीच्या आजाराने सप्टेंबर महिन्यात मंबईत आतापर्यंत सहा मृत्यू झाले आहेत.

साथीचे आजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधित उपाययोजनांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर आणि यंदा सप्टेंबर महिन्यातील मुंबईतील रुग्णांची आकडेवारी :