मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या घरी ई-चलन पाठवून दंड वसुलीचे निर्देश दिले जातात. मात्र अनेक जण अशी ई-चलन घरी आल्यानंतर दंडच भरत नाहीत. असा दंड थकवणाऱ्यांची मुंबई वाहतूक पोलिसांची यादी तपासाल, तर तुम्हाला धक्का बसेल. कारण वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्यांमध्ये राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता सलमान खान यासारख्या दिग्गजांची नावं आहेत. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त दिलं आहे. वेगमर्यादा, सिग्नल न पाळणे, नो एण्ट्रीत गाडी घुसवणे, झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणे अशाप्रकारच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून वाहतूक पोलीस तब्बल 119 कोटी रुपये वसूल करणार आहे. ज्या मुंबईकरांना वाहतूक पोलिसांनी ई चलन पाठवलं आहे, त्यामध्ये अभिनेता सलमान खान, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नावं आहेत. इतकंच नाही तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर वापरत असलेल्या गाडीचंही नाव या यादीत आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, कॉमेडीयन कपिल शर्मा, भाजप प्रवक्ते राम कदम यांनीही ई चलनद्वारे पाठवलेला दंड भरलेला नाही. मात्र या सर्वांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत किंवा चालकाने चुकून वेगमर्यादा ओलांडली असेल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच काहींनी आमच्यापर्यंत ई चलन आलंच नसल्याचं म्हटलं आहे. कोणावर किती दंड? राज ठाकेर – गाडी नंबर - MH 46 J 9 28 फेब्रुवारी 2017 - फॅन्सी नंबरप्लेटसाठी 1 हजाराचा दंड.
  • झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड
MH 02 BY 2727: मालक - अरबाज खान प्रोडक्शन 23 जानेवारी 2018 – वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड 10 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड, 31 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड, 21 जुलै 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड एकूण – 4 हजार रुपये दरम्यान, सलमानच्या कुटुंबीयांनी आम्हाला कोणतंही ई चलन आलं नसल्याचं सांगितलं. तसंच कोणत्याही दंडाची पावती आली तर ती तातडीने भरल्याचंही सांगितलं. MH 02 CB 1234 – आदित्य ठाकरे
  • 10 डिसेंबर 2016 - झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड
  • 8 जानेवारी 2018 – वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
  • 23 जानेवारी 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
  • 11 मार्च 2018 वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
  • 29 एप्रिल 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
  • 1 मे 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
  • 3 मे 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन– 1 हजाराचा दंड
  एकूण – 6 हजार 200 दरम्यान, आदित्य ठाकरे हे कायदे पाळणारे आहेत. त्यांच्या चालकाने नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती त्यांना नसावी. त्यांना कोणतंही ई चलन आलं नाही, असा दावा शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांनी केला. MH 04 Fz 770 – कपिल शर्मा – 2 हजार रुपये थकीत MH 06 BE 4433 - परिवहन मंत्री दिवाकर रावते - वेग मर्यादेचं उल्लंघन- 1 हजार रुपये. ही गाडी दिवाकर रावते यांचा मुलगा उमेशची आहे. रावतेसाहेब गाडीत नसताना चालकाने नियमांचं उल्लंघन केलं असेल, असं स्पष्टीकरण शिवसेना नेत्यांनी दिलं. दुसरीकडे भाजप प्रवक्ते राम कदम यांनी MH 04 FA 4444 या नंबरची गाडी विकल्याचं सांगितलं. संबंधित बातम्या ड्रायव्हिंग लायसन्स डिजीटल रुपात तपासा, केंद्राचे आदेश