पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत, आयआयटीच्या दीक्षांत सोहळ्याला हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2018 10:39 AM (IST)
मुंबई आयआयटीच्या 56 व्या दीक्षांत सभारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई आयआयटीच्या 56 व्या दीक्षांत सभारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी आज सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. आयआयटी कॉन्वोकेशन हॉलमध्ये थोड्याच वेळात दीक्षांत सभारंभाला सुरुवात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदी संबोधित करतील. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याशिवाय मोदींच्या हस्ते ऊर्जा भवन आणि इंजिनिअरिंग तसंच पर्यावरण शास्त्र आणि अभियांत्रिकी सेंटरचं उद्घाटन होणार आहे. 1958 मध्ये स्थापन झालेल्या आयआयटी मुंबई यंदा हिरक महोत्सव साजरा करत आहे.