मुंबई: मुंबईतल्या युवासेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्र्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. मोर्चा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी की नवं नेतृत्व उभारण्यासाठी काढतायेत, असा जळजळीत सवाल विनोद तावडेंनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील गोंधळाचा पाढा वाचण्यासाठी युवा सेनेतर्फे केजी टू पीजी महामोर्चा काढण्यात येणारा आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते इस्लाम जिमखाना दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणारा आहे.
मोर्चाचा समारोप एका सभेत होणार असून त्यात शिक्षण विभागातल्या गोंधळावर आदित्य ठाकरे बोलणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येत असल्याने या मोर्चासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.